विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
आलापल्ली -
धम्म संघमित्रा बुद्ध विहार आलापल्ली येथे वर्षवासाच्या कालावधीमध्ये जेष्ठ उपासिका शारदाताई चालूकर अध्यक्षा शोभाताई सुखदेव दुर्योधन ललिताताई अलोने पंचफुलाताई फुलझले या श्रद्धावान उपाशिका तब्येतीची परवा न करता सकाळच्या धम्म वंदनासाठी हजर राहतात. यांच्यापासून युवक युवतींना प्रेरित होऊन पुढे वर्षावासाचा काळ हा धम्ममय वातावरणात सुरू रहावा. यासाठी जेष्ठ उपाशिकांना सुशीला बुद्ध भगवान भगत समाजसेविका आल्लापल्ली यांच्या भगत परिवाराकडून साडी चोळी व बुद्धमूर्ती स्नेहभेट म्हणून सुनबाई रमाताई गौरव कुमार भगत व नातू विहार गौरव कुमार भगत यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. संघमित्रा बौद्ध विहार आलापल्ली येथे. या कार्यक्रमाला व धम्म प्रवचन पुष्पमाला ऐकण्याकरिता दर रविवारी बहुसंख्येने बुद्ध उपासिका बौद्ध उपासक हजर राहतात. पंधरा ते वीस वर्षापासून संघमित्रा बौद्ध विहारांमध्ये वर्षावासाचा कार्यकाळ सकाळी सहा वाजता धम्ममय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. श्रद्धावान उपाशिका व उपासक साडेपाच वाजता बौद्ध विहार खुले करतात.

Post a Comment