गडचिरोली सुपरफास्ट न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
पाथरी - सावली तालुक्यातील पाथरी येथील कास्तकार शेतावर गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याला ठार केले.
पाथरी येथील रहिवासी श्री पांडुरंग भिका चचाणे वय ६० वर्ष हे दिनांक ४ सप्टेंबर ला नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये सकाळी नऊ वाजता बघण्याकरिता गेले होते त्याच वेळेला दबा धरून बसलेल्या ढाण्या वाघाने अत्यंत जोमाने त्यांना पकडून ठार केले. पांडुरंग ह्यांचा दुर्दैवी घात केला आणि त्यात त्यांचा प्राण गेला. झालेल्या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच
घटनास्थळी धाव घेऊन पांडुरंग यांचा शोध घेतला व वनविभागाला माहितीदेण्यात आली वनविभाग पाथरी चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पांडुरंग ह्याला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविण्यात आले. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी गावकऱ्याकडून मागणी करण्यात आली. पांडुरंग त्यांच्या दुदैवी मृत्युमुळे गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.


Post a Comment