आरपीआयच्या प्रयत्नाने रेगडी ,घोट रस्त्याची दुरुस्ती, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त....

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा .
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


चामोर्शी - रिपब्लिकन पार्टीच्या टिमने चामोर्शी तालुक्यातील घोट - रेगडी रोड ची पाहणी केली असता सदर रस्ता खड्डेमय तसेच खड्यात पाणी साचले होते त्यामुळे घोट वरुन रेगडी जाणाऱ्या वाहनांना नाहक त्रास करून प्रवास करावा लागत होतो. त्यामुळे आयपिआयचे जिल्हा सरचिटणीस विशाल दहिवले घोट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून घोट -रेगडी रस्ता दुरस्त करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती व येत्या आठ दिवसात रस्त्याची दुरस्ती न केल्यास रिपाईचे वतीने आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा दिला होता.


आजच्या स्थितीत रेगडी - घोट रस्त्याचे काम खड्डे बुजवून केल्या जात आहे त्यामुळे आयपिआयचे सरचिटणीस विकास दहिवले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments