तोयागोंदि येथील शेतकऱ्यांच्या शेतातून हजारो ब्रास अवैध मुरुम उत्खनन करून मोहली ,जपतलाई रोडच्या कामावर वापरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा..

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
धानोरा ब्युरो 


धानोरा - धानोरा तालुक्यातील तोया गोंदी येथील गिरजाबाई कोरेटी हिच्या शेतातुन सर्व्ह नंबर - ५६ क्षेत्र २०४ हे .आर पैकी हे . आर ०.१० मधुन १५० ब्रास मुरुम उत्खनन करून वाहतुक परवाना मिळवला होता परंतु त्या सर्व्हे मधुन अंदाजे २००० ब्रास मुरुम उत्खनन करून सदर मुरुम मोहली - जपतलाई सुरू असलेल्या रोडवर टकण्यात आलेला आहे यावरून असे दिसुन येते की तोयागोंदी येथील तलाटी व मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने सदर प्रकार सुरूआहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडाला आहे अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या ठेकेदारा कडून पाच पट दंड वसुल करुन त्यांचे नाव काळ्या यादित टाकावे येथील तलाटी व मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करावीअश्या प्रकारची मागणी तहसिलदार धानोरा यांचेकडे तिन महिन्यापुर्वी तक्रार करूनही अजुन पर्यत कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता रविंद्र सेलोट यांनी दिलेला आहे .

0/Post a Comment/Comments