विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
आरमोरी येथील सर्वे नंबर 1242 हा महाराष्ट्र कुरण सरकारच्या नावाने आहे. ही जागा प्लॉट विक्रेत्यांनी विकायला काढली याबद्दलची स्थानिक प्रशासनाला माहिती असून सुद्धा स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या सोबत चर्चा करून बाराशे 42 हा महाराष्ट्र पुरण सरकारच्या नावाने असून या जागेवर प्लॉट विक्रेत्यांनी प्लॉट पाडून सरकारी जमीन चक्क विकायला काढली याबाबतचे तहसीलदार आरमोरी यांना 6 मार्च 2025 ला निवेदन देऊन ही माहिती निदर्शनास आणून दिली. नगरपरिषद आरबरी व भूमी अभिलेख उपाध्यक्ष यांना सुद्धा
मौखिक निदर्शनास आणून दिले परंतु आजपर्यंत कोणत्याही संबंधित प्रशासनाने प्लॉट विक्रेत्यांवर कार्यवाही केली नाही प्लॉट विक्रेत्यांची संबंधित प्रशासनाची साठे लोटे आहेत की काय असा प्रश्न येतील जवळील नागरिकांना पडला आहे. याबद्दलची चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शेंडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा मेश्राम,वडसा शहराध्यक्ष अशोक मेश्राम, तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम, महिला आघाडी शहराध्यक्ष लता बारसागडे,राधा हुमणे, विजय मेश्राम, दिलीप बनसोड,राजेंद्र बारसागडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते



Post a Comment