लायन्स क्लब गडचिरोली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव आणि सावित्रीबाई फुले डिजिटल प्राथमिक शाळा गोकुळ नगर गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे भव्य आयोजन....

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा तसेच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी लायन्स क्लब गडचिरोली तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव व सावित्रीबाई फुले डिजिटल प्राथमिक शाळा गोकुळनगर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, फळवाटप कार्यक्रम आणि रोजगार कौशल्य विकसन मार्गदर्शन शिबिर यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक जाणिवांमध्ये भर पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माननीय देवेंद्र लांजेवार सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष लॉ. महेश बोरेवार , लॉ. नितीन बट्टूवार सचिव , लॉ. सुरेश लडके सर, लॉ. नितीन चंबुलवार सर, लॉ. शांतीलाल सेता सर, लॉ. भुजंग हिरे सर यांची उपस्थिती लाभली. रोजगार व व्यवसाय कौशल्य मार्गदर्शनासाठी विशेषतः डॉक्टर पंकज नरुले सर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी चित्रकला व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आत्मविश्वासाने आपली मते मांडून प्रेक्षकांची दाद मिळवली.


*रोजगार कौशल्य विकसन मार्गदर्शन*

डॉ. पंकज नरुले सर यांनी विद्यार्थ्यांना रोजगार आणि व्यवसाय कौशल्य विकसन या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान, संवादकौशल्य, उद्योजकता आणि रोजगारनिर्मिती या बाबतीत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

*फळवाटप कार्यक्रम*

आरोग्य हा खरा धनसंचय असल्याचे पटवून देण्यासाठी फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला. फळांच्या सेवनाने मिळणारे पोषण, जीवनसत्त्वे आणि निरोगी आयुष्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल जागृती झाली.

*कार्यक्रमाचा प्रभाव*

या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, आत्मविश्वास वाढला तसेच स्पर्धात्मक वृत्ती जोपासली गेली. वकृत्व स्पर्धेतून विचार मांडण्याची कला आणि संवादकौशल्य वृद्धिंगत झाले. चित्रकला स्पर्धेतून सृजनशीलता व कलात्मक अभिव्यक्तीला चालना मिळाली. कौशल्यविकास मार्गदर्शनामुळे करिअर घडविण्याची दिशा मिळाली, तर फळवाटप कार्यक्रमामुळे आरोग्यविषयक जाणीव जागृत झाली.

*यशस्वी आयोजन*

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री देवेंद्र लांजेवार सौ उषा बोरकर कुमारी वर्ष नाकाडे श्री संतोष कोल्हे श्री रमेश काळबांडे, लायन्स क्लब सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालकांचा उत्साह पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले नगर परिषद डिजिटल प्राथमिक शाळा गोकुळनगर, गडचिरोली येथे कार्यक्रमाला उपस्थित
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. शिलाताई मेश्राम. सदस्य मा. माणिक बोरकर, मा. विकास आऊतकर, मा. शाहिनाताई पठाण, मा. किरणताई मगरे व सर्व शिक्षक उपस्थित होते., शिक्षक श्री.सुनिल नरके यांनी संचलन केले व जेष्ठ शिक्षिका माधुरी म्हस्के यांनी आभार प्रकट केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षिका सारिका वांढरे यांचे सहकार्य लाभले.

अशा प्रकारे लायन्स क्लब गडचिरोली आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव व सावित्रीबाई फुले डिजिटल प्राथमिक शाळा गोकुळनगर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जाणिवांची जाणीव करून दिली.

0/Post a Comment/Comments