_आरोग्य हीच खरी संपत्ती – मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य शिबीरात प्रतिपादन....आष्टी येथे मोफत शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न_

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
चामोर्शी ब्युरो 




आष्टी ता.चामोर्शी (दि. २० सप्टेंबर २०२५) :
आष्टी येथील सावित्रीबाई फुले शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन श्री. छत्रपती शिव स्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्था, आष्टी व सेवार्थ फाऊंडेशन (एक हात मदतीचा), चंद्रपूर यांनी संयुक्त विद्यमाने केले.

या शिबिराचे अध्यक्षस्थान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भूषविले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले :"आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शरीर निरोगी असेल तरच मानसिक दृष्ट्याही निरोगीपणा लाभतो. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते, त्यामुळे परिसर, घर आणि शरीर – तिन्ही ठिकाणी स्वच्छता आवश्यक



 आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत हे आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. याच माध्यमातून आरोग्य तपासणी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात राबविलेल्या ‘आयुष्यमान भारत योजना’ व ‘स्वच्छ भारत अभियान’ ही याचीच जिवंत उदाहरणे आहेत," असे त्यांनी प्रतिपादन केले.


*आरोग्य शिबिराचे मुख्य उद्देश*
या शिबिरात विद्यार्थ्यांची उंची, वजन, डोळे, दात, रक्त तपासणीसह त्वचेवरील आजार, तोंडाच्या स्वच्छतेची माहिती, पोषक आहाराचे मार्गदर्शन, आरोग्य शिक्षण, खेळांचे महत्त्व, लैंगिक शिक्षण अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच पालकांना मुलांच्या योग्य आहार व वाढीबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

या शिबिराचे उद्घाटन गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, सरपंच बेबीबाई बुरांडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, मुख्याध्यापिका गलबले मॅडम, ग्रामीण रूग्णालय आष्टीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धाकडे, सामाजिक नेते संजयजी पंदिलवार, नरेश अल्सावार, शेषराव कोहळे, सुरेश गुंतीवार, आयोजक अध्यक्ष पवन रामगीरवार, संदीप तिवाडे, संदीप लोडेलीवार, देवा बोरकुटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
‌‌‌ या शिबिरामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास हातभार लागला असून, सेवा पंधरवड्याच्या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
                           यावेळी गावातील नागरिकांनी पाणीपुरवठा व इतर स्थानिक समस्या माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांना लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे सादर केले. त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

गावातील नागरिक, पालक व शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमानंतर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना आलू-भात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.


0/Post a Comment/Comments