तलावात उडी घेऊन इसमाने केली आत्महत्या...


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
कुरखेडा ब्युरो 


कुरखेडा : तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उराडी येथील पंचायत समितीच्या माजी सदस्या कविता कोकोडे यांचे पती चरणदास चेपतू कोकोडे (वय 47) यांनी दीर्घकाळाच्या आजाराने त्रस्त होऊन राहत्या घरापासून काही अंतर जवळच असलेल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उराडी येथील चरणदास कोकोडे यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते अशी माहिती आहे. दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी मध्यरात्री ते पहाटे दरम्यान आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ते घरात न आढळल्याने कुटुंबीयांनी इतरत्र शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या शेततळ्यात पाण्यावर तरंगताना आढळून आला.
लागलीच घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर घटनेने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतकाच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments