आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील शेत शिवारात जंगली हत्तीने घातला धुडगूस शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे दिनांक 19**7** 2025 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कंपार्टमेंट 48 जंगलातून काही जंगली हत्तीच्या कळप जंगला लगत असलेल्या शेतामध्ये शिरकाव करून धुडगूस घालून शेतामध्ये उभे असलेले धान्याचे पीक पूर्णता तुडवल्याने शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . काही शेतकऱ्यांचे धान्याचे रोप हत्तीने तुडविल्याने धान्याचे रोप रोवण्याकरिता आणावे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . शेतकऱ्यांच्या



 शेतावरील धुरे*पारे सुद्धा हत्तीने उगदले आहे. एकूण नुकसानीची माहिती वनरक्षक वाळके यांना दिली असता वनविभागाचे वनरक्षक वाळके आणि त्यांचे सहकारी देवानंद उरकुडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोका चौकशी करून शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचा पंचनामा केला आहे.


शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई देऊ असे वनरक्षक वाळके यांनी सांगितले आहे. वन प्रशासनाने हत्तीच्या बंदोबस्त करण्याकरिता काही उपाययोजना करून शेतकऱ्यांची होणारे नुकसान टाळावी .अशी मागणी  शेतकरी वर्गातून आता जोर धरू लागली आहे.

(शेतकरी प्रतिक्रिया मनोहर मुल्लेवार शेतकरी कोजबी )
माझे तीन एकर शेत आहे शेतामध्ये मी यावर्षी चालू हंगामामध्ये धान्याची लागवड केली धान्य पीक बहरात आल्यानंतर जंगली हत्तीने शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास माझ्या शेतामध्ये शिरकाव करून धान्याची तुडवण केल्याने माझे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुद्धा जंगली हत्तीने माझ्या शेतामध्ये शिरका व करून धान्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
  दरवर्षी जंगली हत्तीकडून धान्य पिकाची नुकसान होत राहील तर आम्ही शेतकरी वर्ग करावे तरी काय? शासनाने या जंगली हत्तीचा बंदोबस्त करावा आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया कोजबी  येथील शेतकरी मनोहर मुल्लेवार यांनी गडचिरोली सुपरफास्ट न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक दिनेश बनकर यांच्या जवळ   व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments