गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
आरमोरी - परीसरातील नागरीकांना दुरसचारची सेवा उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकार दुरसचार निगम अंतर्गत जोगीसाखरा पळसगाव पाथरगोटा शंकरनगर सालमारा गावात बिएस एन एल चे ट्रावर उभारुण सेवा मिळत होती परंतु गेल्या दोन दिवसांपुर्वी आरमोरी जोगीसाखरा रस्तेवरील पालोरा गावालगतच्या रेल्वेच्या पुलियाच्या खाली रेल्वे प्रशासनाच्या वतीने नाली बांधकाम करण्यासाठी पोकलेडच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले त्यावेळी बिएस एन एलचे अंडरग्राऊंड वायरिंग सर्किट टुडल्यामुळे दोन दिवसांपासून बिएस एन एल सेवाचे कव्हरेज बंद झाल्यामुळे ग्राहकाची व शासकीय व निमशासकीय तसेच कामे करणाऱ्या नागरीकाची अडचण निर्माण झाल्याने नागरीकानी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा दुरसचार विभागाचे सल्लागार सदस्य दिलीप घोडाम यांच्या कडे मोठ्या प्रमाणात समस्या सांगितले असता गडचिरोली दुरसचारचे जनरल मॅनेजर यशवंत गोनाडे व जनरल मेनेजर साहु यांना समस्या तातडीने
सोडविण्याची मागणी केली असता त्यांनी सांगितले कि पालोरा पुलिया लगत अदरग्राऊड केबल टुडलेला आहे असे सागतात सल्लागार सदस्य दिलीप घोडाम यांनी रेल्वे कम्पनीचे अभियंता कोमल बिजेवार यांना दुरध्वनी पोकल्याड मशीन उपलब्ध करून द्या असे सांगतात पोकल्याड उपलब्ध होऊन खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे आज किंवा उद्या परीसरातील दुरसचारची सेवा सुरळीत होणार आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सल्लागार सदस्य दिलीप घोडाम दुरसचारचे अभियंता प्रशांत खोब्रागडे गडचिरोली चे टेनिशिएल भारत अबरे रेल्वे कम्पनीचे अभियंता कोमल बिजेवार उपस्थित होते.


Post a Comment