जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील औषधी घोटाळ्याच्या संबंधात, औषधी निर्माण अधिकारी निलंबित...

गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा .
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे २०१९पासून औषधी खरेदी विभागात औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले देशमुख घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी पाठपुराव्या सहीत उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांचेकडे करण्यात आल्या होत्या . त्यामुळे आर्थिक अनियमताचा ठपका ठेवत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी आज १६जुलै रोजी निलंबनाचे आदेश जिल्हा सामान्य रुग्णालय अधिकारी गडचिरोली यांचेकडे पाठविल्याचे कळते .
त्यांच्या बाबतच्या तक्रारी पालकमंत्री,सहपालकमंत्री यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या तक्रारीची चौकशी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत करण्यात यावी असे आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी चौकशी समिती गठित करून त्या चौकशी अहवालात आर्थिक अनियमयता झाल्याची शक्यता वर्तवून त्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत उपसंचालक आरोग्य सेवा यांना कळविले त्यानुसार सहसंचालक, अर्थ व भांडार, आरोग्य सेवा मुंबई यांनी तपासणी केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याने त्यांनी नियुक्त प्राधिकारक उपसंचालक यांना निलंबन करण्याचे आदेश दिले या बाबत जिल्हा सामान्य रुग्णालय अधिकारी ( C .s ) यांना फोनवरून विचारणा केली असता उत्तर मिळाले नाही.

0/Post a Comment/Comments