गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केला. या विधेयकामुळे संविधानातील मुलभुत हक्क व अधिकार अनुच्छेद १९ चे उलंघन होणार आहे. यामुळे शासन जनतेच्या विरोधात कायदे करेल. तर बहुजन समाजाला पुन्हा गुलामगिरी कडे नेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जनसुरक्षा विधेयक हे जनतेची सुरक्षा करणारे नसुन मुठभर उद्योगपती व भांडवलदाराचे संरक्षण करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट् शासनाने हे विधेयक रद्द करावे व राज्यपालांनी याला मंजुरी देऊ नये. यासाठी आरपिआय चे जिल्हाधक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर यांचा नेतृत्वात एका शिष्ठमंडळाने आज दि. २५ जुलै दुपारी २ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचे मार्फत राज्यपाल यांना पाठविण्यात आले.
सदर विधेयक रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करण्यात येइल अशा ईशाराही आरपिआय व बामसेफ च्या वतीने देण्यात आले.
सदर शिष्टमंडळात रिपाईचे प्रा. मुनिश्वर बोरकर बामसेफ चे भोजराज कान्हेकर रिपाईचे उपाध्यक्ष दशरथ साखरे ,मारोती भैसारे , पत्रकार दिनेश बनकर बामसेफचे प्रमोद राऊत , तुळसिराम सहारे , डोमाजी गेडाम , दामोधर शेंन्डे , प्रेमदास रामटेके , नरेंद्र शेंन्डे तर रिपाईचे धनराज पाझारे , जिवन मेश्राम , रोशन उके नामदेव दुधे , मदन उराडे , लवकुश भैसारे , मोरेश्वर निमगडे , चोखोबा ढवळे ' हेमंत बारसागडे ' जैराम उंदिरवाडे , सुरेश मेश्राम , नेताजी मेश्राम , नाजुक भैसारे , संघमित्रा राजवाडे , लता लिहितकर , ज्योती मेश्राम , प्रेमिला नान्होरीकर , आशा हुमणे ' विभा खेवले , रोजा घांगरगुंडे , गोवर्धन मॅडम , भोयर मॅडम , वंजारी मॅडम सहीत रिपाई - बामसेफ चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment