गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
धानोरा - धानोरा तालुक्यातील गोडलवाही ग्रामपंचायत मधे एका कार्यक्रमात टॅचबिन चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत गोडलवाही चे सरपंच विनाजी तुलावी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक चांगदेव कन्नाके , पशु वैद्यकिय अधिकारी राऊत , अंगणवाडी सेविका केदार मॅडम , माजी
उपसरपंच रविंद्र बोगा कॉम्पुटर चालक उंदिरवाडे मॅडम , अनिता बोगा , नागुलवार सर , आदि लाभले होते.
.याप्रसंगी सरपंच तुलावी म्हणाले की , स्वच्छ घर , स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे टॅचबिन देत आहोत यांचा उपयोग सर्वांनी करावा असे सांगीतले तर सरपंच तुलावी यांचे हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
गोडलवाही , गोडलवाही टोला , ताह कापार, हिपानेर व कुपानेर आदि गावातील महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहून टॅचबिन चा उपभोग घेतला. सदर कार्यक्रमात गडचिरोली गोडलवाही ते पेंढरी पर्यंतची बससेवा सुरु करावी अशा ठरावही घेण्यात आला.



Post a Comment