गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली -
पावसाळी अधिवेशन दरम्यान दि.18 /7 ला आमदार रामदास मसराम यांनी व आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी मांडली.व आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ अशोक ऊईके साहेब यांनी विधानसभेत संगीता चव्हाण यांच्या बडतर्फीची घोषणा केली. मराठा समाजाला आदिवासींचे वैधता प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या सह आयुक्त संगिता चव्हाण यांनी पदाचा गैरवापर करून बोगस आदिवासींना बनावट कागदपत्रांच्या आधारे वैधता प्रमाणपत्र दिले होते.त्यामुळे ख-या आदिवासींवर अन्याय झाला.त्यांना शिक्षण,नोकरी पासून वंचित राहावे लागले.ही लक्षवेधी मांडून ख-या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आमदार रामदास मसराम सर यांनी केला त्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश सचिव कुसुमताई अलाम,युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, सुनिता उसेंडी,मालता पुडो यांनी कांग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी जेसाभाऊ मोटवानी,जि प गडचिरोली चे माजी उपाध्यक्ष जीवनभाऊ नाट, माजी सभापती फरसरामजी टिकले यांच्या उपस्थितीत आमदार रामदास मसराम यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment