विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
तालुक्यातील चुरमुरा सूर्य डोंगरी आकापूर इंजेवारी व पेठ येथील शेतकऱ्यांचे धान्याचे पीक दि.21..9..2026 च्या रात्री सुमारास अक्षरस जंगली हत्तीने तुडवून टाकल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याची मोठी चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस शेत शिवारात जंगली हत्तीचे मार्गक्रमण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतावरती जाणे कठीण होत आहे. गेल्या चार वर्षापासून हत्तीकडुन धान्य पिकाच्या नुकसानीचा शेतकऱ्यांवरती प्रसंग ओढवत आहे.हत्तीचा वाढलेला उपद्रव रोखण्यास अद्यापही वन विभागाला यश न आल्याने वन विभाग प्रति शेतकरी व गाव परिसरातील जनतेमध्ये रोश्याची भावना निर्माण झाली आहे . शेत शिवारात व गाव परिसरात जंगली हत्तीचा उपद्रव वाढल्याने जंगली हत्तीच्या उपद्रव्यावर काही योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकरी यांनी वन विभागाकडे केली आहे. आणि जंगली हत्तीकडुन मोठ्या प्रमाणात धान्य पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

Post a Comment