प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या गडचिरोली दौऱ्याच्या नियोजनासाठी वडसा येथे भाजपची महत्त्वपूर्ण बैठक!*

विदर्भ दखल न्यूज 
 वडसा / देसाईगंज 
| दि. १० ऑगस्ट २०२६


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आदरणीय आमदार श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या आगामी १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा/देसाईगंज दौऱ्याच्या व पदाधिकारी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, काल वडसा येथे एक अत्यंत महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली.
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या विशेष उपस्थितीत व नेतृत्वाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी वडसा/देसाईगंज नगर परिषदेतील सभागृह व बैठक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी सुद्धा करण्यात आली.

🤝 प्रमुख उपस्थिती:
या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, आरमोरीचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, वडसा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, आरमोरी तालुका अध्यक्ष पंकज खरवडे यांच्यासह बबलूभाई हुसैनी, राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, विलास पारधी, दुबे महाराज, अक्षय हेमके, उल्हास देशमुख आणि पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🇮🇳 प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा आणि पदाधिकारी मेळावा अभूतपूर्व रीतीने यशस्वी करण्याचा दृढ संकल्प या वेळी उपस्थितांनी केला!

0/Post a Comment/Comments