विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -
मुनिश्र्वर बोरकर
संपादक
*कुरखेडा : -* शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो आहे म्हणून साऱ्या जगाचे भरणपोषण होत आहे. हीच त्याची जाणीव ठेवून मूळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल ह्या नेहमीच परखडपणे शेतकऱ्यावर तसेच सामाजिक विषयावर लिखाण करून समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती करत असतात. आज त्यांनी लिखाणापर्यत मर्यादित न ठेवता महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या देऊळगाव येतील सार्वजनिक सभामंडपात शेतकरी बंधू ,भगिणींच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात प्रतिष्ठित नागरिक वासुदेव कोल्हे यांना पुष्पगुच्छ शाल, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केले. तसेच शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उमाजी पाटील खुणे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ, शाल पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच जेष्ठ नागरिक रामदासजी खुणे व नमुदेव हनवते यांचा सुद्धा पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नमुदेव हनवते म्हणाले की, साहित्यिक संगीता ठलाल नुसत्या लिहितच नाही तर त्या कृतीतून उतरवून दाखवतात.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण,त्याचा सर्वांना विसर पडत आहे. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त जिकडे, तिकडे शेतकऱ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, पण,असं होताना दिसत नाही पण,संगीता ठलाल सारख्या खेड्यापाड्यातील महिला जेव्हा समाजाचे हीत ठेवून कार्यरत असतात ही अभिमानाची बाब आहे. उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी, बंधू भगिणींना संगीता ठलाल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केले व तोंड गोड करून महाराष्ट्र शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या या कार्यक्रमाविषयी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभार मानले. या शुभप्रसंगी उपस्थित असलेले शेतकरी रामचंद्र वैरागडे, दिपक नाकाडे, यशवंत ठलाल, शुभम नाकाडे, श्रावण ठलाल, दयावती कोल्हे, देवकूबाई नाकाडे, मालुबाई मुर्वतकार, सुनिता मेश्राम, माधुरी कोल्हे, वच्छला धुर्वै,सरिता चंदेल होते.या सत्कार समारंभाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी केले होते.

Post a Comment