जेष्ठ समाजसेवक साजन मेश्राम वडसा यांनी ५५ वेळा केले रक्तदान ..

विदर्भ दखल न्युज.
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - डॉ. आंबेडकर वार्ड देसाईगंज वडसा येथील सामाजिक कार्यकर्ते समता सैनिक दलाचे मुख्य सल्लागार तथा बौद्ध समाज कोअर कमिटीचे उपाधक्ष साजन मेश्राम यांनी तब्बल ५५ वेळा रक्तदान केले व अनेकांचे जिवन वाचविले.
त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली वतीने साजन मेश्राम यांचा सत्कार केला.
जागतिक रक्तदाता दिना निमित्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. इंद्रजित नागदेवते डॉ. छाया उईके डॉ. सचिन कारंजेकर व रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. राजन मेश्राम यांना शाल व श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.


गरजुंना रक्त देऊन अनेकांचे जीव वाचविण्याचे महान कार्य साजन मेश्राम यांनी केल्याबद्दल डॉ. आंबेडकर वार्ड देसाईगंज सहीत जिल्ह्यात राजन मेश्राम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments