अवैध होणाऱ्या वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मारली धाड.. पोलिसांच्या धाडीमधे एक ट्रॅक्टर जप्त आरमोरी पोलिसांची कारवाई..

विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली आरमोरी

                        (फाइल फोटो)
आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी येथील नदीकाठा जवळील वाळू घाटावरती रात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन करून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली असता पोलीस विभागाने सापळा रचून अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले. सदर ट्रॅक्टर राजेश काशिनाथ बेंद्रे वय 33 वर्षे राहणार डोंगरगाव भुसारी यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती अंदाजे किंमत 3500रुपये ट्रॅक्टर क्रमांक एम एच 33 R 325 किंमत अंदाजे 300000 रुपये असे एकूण 3लाख 3500 रुपयांचा मुद्देमान पोलिस विभागाने जप्त केला आहे वैरागड मंडळ अधिकारी कुंमरे यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याची नोंद आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक मोहुर्ले यांनी केले असून पुढील तपास पोलीस हवालदार किशोर मेश्राम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे या पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांची धाबे दणाणले आणले आरमोरी तालुक्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रात्रीच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक होत आहे प्रशासनाने अवैध होणाऱ्या वाळूच्या वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीच्या सुमारास गस्त लावून अवैध वाळूची होणारी वाहतूक थांबवावी अशी मागणी आता जनतेमधून जोर धरू लागली आहे

0/Post a Comment/Comments