जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे पार पडला निरोप समारंभ...

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 



आरमोरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मिडस्कुल वर्ग आहेत. दरवर्षी या शाळेतून सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील आठव्या वर्गापासून हायस्कूल  शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये  जात असतात यामुळे सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करून दरवर्षी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात येत असतो आणि याचाच एक भाग म्हणून दिनांक 17 4 2026 ला शाळेच्या वतीने निरोप



 समारंभ आयोजित करण्यात आला  यामध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला या सोबतच शाळेचे मुख्याध्यापक चिलबुले सर यांचे स्थानांतरण दुसऱ्या शाळेत झाल्याने  त्यांच्या सुद्धा विद्यार्थ्यासोबतच सत्कार करून त्यांना सुद्धा निरोप देण्यात आला . विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळेमध्ये शिक्षण घेतल्याने 




 शाळेप्रती व शिक्षकाप्रती आणि त्यांना सात वर्षांमध्ये शाळेमधे शिक्षण घेत असताना आलेला अनुभव समारंभाच्या वेळेस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला शिक्षकांनी सुद्धा आपापले मनोगत विद्यार्थ्याप्रति असलेली भावना आपले अध्यापन कार्य निरोप समारंभाच्या वेळी व्यक्त केले. निरोप समारंभाला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेचे मुख्याध्यापक चिलबुले सर प्रशांत ठेंगरे सर आखाडे मॅडम शेंडे सर गावातील  नागरिक विनोद मानकर




 पत्रकार दिनेश बनकर गुलाब ताडाम उपसरपंच प्रवीण चहांदे अनिता लिंगायतसीमा नंदेश्वर रोहिदास सहारे आदी मान्यवर व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती लाभली. शाळेमध्ये आयोजित  करण्यात आलेला निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला. 
 कार्यक्रमाची सुरुवात  दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच निरोप घेणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.                                                                  

                यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.  विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबतच्या आठवणी सांगत त्यांना जीवनात प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. काही विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना शाळेतील आठवणी, मित्रपरिवार आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

               निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच चिलबुले सर यांचा देखील शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच इयत्ता 8 वी ला प्रवेशित विद्यार्थ्यांना देखील पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक  कामगिरीबद्दल भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.   निरोप समारंभाचे प्रास्ताविक शेंडे सर यांनी केले तर संचालन प्रशांत ठेंगरे सर आभार प्रदर्शन आखाडे मॅडम यांनी मानले. 


0/Post a Comment/Comments