सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने आर्थिक मदतीचे वाटप ..

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
आरमोरी 




आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील योगाजी गणपत नंदेश्वर हे बऱ्याच दिवसापासून कर्करोगाने ग्रस्त  होते काही उपचार करून सुद्धा त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती आणि एक दिवस त्यांचे निधन झाले
 योगाचे नंदेश्वर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या घरच्यांनी सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन चे सदस्यत्व स्वीकारले होते. यामुळे योगाजी नंदेश्वर यांच्या मृत्यूची माहिती घरच्यांनी सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना देण्यात. आली त्यांनी लगेच त्यांच्या  अंत्यविधी करिता आर्थिक मदत म्हणून शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने त्यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. सदर आर्थिक मदत कोजबी ग्रामपंचायत सरपंच कविता ताडाम पत्रकार दिनेश बनकर तिलोतमा शेंडे



 जिल्हाप्रमुख सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन विद्या मेश्राम, अलका मेश्राम यांच्या हस्ते योगाजी नंदेश्वर यांच्या पत्नी यांना धनादेशाच्या स्वरूपामध्ये  देण्यात आली . सैनिक शेतकरी  वेल्फेअर फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष तिलोतमा शेंडे यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार देण्यात आली  यावेळी कोजबी सरपंच कविता ताडाम पत्रकार दिनेश बनकर पुंजाराम शेंडे दीक्षा खेवले भाविका बनकर नेपाल बनकर नीलिमा पावले व योगाजी नंदेश्वर यांच्या पत्नी व परिवार गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments