विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते थकल्याने घरकुल लाभार्थी संकटात घरकुल लाभार्थ्यांचे हप्त देण्याचे घरकुल लाभार्थी यांनी केली प्रशासनाला मागणी आरमोरी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये शासनाच्या वतीने सन 2024 2025 या वर्षामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना शबरी आदिवासी घरकुल योजना रमाई आवास योजना यासारख्या आवास योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आणि घरकुलाचा पहिला हप्ता सुद्धा लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला पहिला आता वितरित झाल्यानंतर घरकुल लाभार्थ्याने घर बांधकामाला सुरुवात केले आणि सिमेंट लोहा गीट्टी आदी घरकुल बांधकामाला लागणारे साहित्य दुकानदाराकडून उसने उधारावर खरेदी केले मात्र प्रशासनाने पहिला हप्ता वितरित झाल्यानंतर काही घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता वितरित न केल्याने घरकुल लाभार्थी मोठे आर्थिक संकटात सापडले आहे घरकुल लाभार्थ्च्या घरी घरकुल बांधकामाला साहित्य देणारे दुकानदार घरकुल बांधकाम करणारे मिस्त्रीयांचा पैश्याकरिता घरकुल लाभार्थ्यांच्या घरी येणे जाणे सुरू झाल्याने घरकुल लाभार्थी यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेता. घरकुल योजनेचे हप्ते घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर वितरित करावे आणि घरकुल लाभार्थ्यांना होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्त करावे अशी मागनी घरकुल लाभार्थ्यांनी प्रशासनाला केली आहे.

Post a Comment