आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे भीषण अपघात.. अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी..


विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो


आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे आज भीषण अपघाताची घटना घडली या अपघातामध्ये रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या एका इसमाला दुचाकी धारकाने जोरदार धडक दिल्याने पायी चालणारा पादचारी व दुचाकी चालक हे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मध्ये पादचारी जगदीश खानोरकर दुचाकी चालक एस कुमार कोवा राहणार भट्टेगाव अशी अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत .मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे 4..3.2026रोजी 12 वाजे सुमारास वनविभागाच्या कार्यालयाजवळ मुख्य रस्त्याने पादचारी जगदीश खानोलकर हे रस्त्याने पायी जात असताना मागून येणाऱ्या दुचाकी धारक एस कुमार कोवा राहणार भटेगाव याने जगदीश खानोरकर यांना जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले दोघांना गंभीर दुखापत झाली. देलनवाडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी 108 ॲम्बुलन्सला माहिती देऊन घटनास्थळावर ॲम्ब्युलन्स बोलावली आणि जखमींना पुढील उपचाराकरिता आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली असून घटनेच्या पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments