नागभीड तालुक्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही तर नागभिड ते बामणी मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.. तालुक्यातील सामान्य जनता व बेरोजगार पडले विचाराच्या खाईत...


विदर्भ दखल न्यूज 
बाळकृष्ण उंबरकर 
तालुका प्रतिनिधी 
नागभीड 


प्रश्न निर्माण झाला आहे नागभीड तालुका मध्यवर्ती ठिकाण असून व मोठ्या प्रमाणात खाली जागेची उपलब्धी असून सुद्धा इथे रोजगारासाठी आधी नवीन उद्योगाची उभारणी कां नाही नागभीड तालुक्यात विविध प्रकारचे मोठमोठी बांधकामे सुरु आहेत यात बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी एकही कारखान्याचे बांधकाम सुरु नाही नागभीड तालुक्यात रोजगाराची उपलब्धी अती आवश्यक असताना दुर्लक्ष कां केल्या जात आहे असाही प्रश्न निर्माण झाला आहे आधी प्राण्यांना महत्व कां बेरोजगार तरुण महत्वाचे नाहीत का आधी या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठमोठे उदयोग उभारून रोजगाराची संधी देणे गरजेचे वाटत नाही का असा सवाल तरुण वर्गातून विचरला जात आहे नागभीड ते बामणी मार्गाची अत्यंत बिकट परिस्थीती निर्माण झाली आहे हा मार्ग अरूंद तर आहेच परंतु रोडच्या कडेला मोठेमोठे खड्डे पडले आहेत या खड्यात अनेक वाहने उलटून व धडकेत अनेकांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर प्राण्यांचा अपघाती मृत्यू होवू नये म्हणून घोडाझरी फाट्याजवळ व सायगाटा फाट्याजवळ ब्रिज चे काम सुरु केले तर नागभीड ते बामणी पर्यंत या अपघात मार्गाचा रुंदीकरण कां नाही हा मार्ग खूप मोठया रहदारीचा मार्ग असून सुद्धा याकडे शासनाचे दुर्लक्ष कां आहे असे जनते मध्ये बोलल्या जात आहे. नागभिड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांची संख्या उफाळत असून त्यांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगार युवकांमध्ये नैराशेचे वातावरण पहावयास मिळत आहे .नागभीड ते बामणी मुख्य रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामाकडे सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक.लक्ष देऊन बेरोजगार व रस्त्याचे रुंदीकरणाची समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी आता बेरोजगार व सामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे .

0/Post a Comment/Comments