चकवीरखल उच्च प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन. बंद पडलेली शाळा आमच्या प्रयत्नाने आज प्रगतीपथावर आहे. डॉ. गोपाल रायपुरे...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक - मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली.


व्याहाड - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चकविरकल तालुका सावली ची शाळा मी गावात असतांना बंद पडली होती याच शाळेत माझा भाऊ मास्तर होता तेव्हा आम्ही गावातील प्रतिष्ठीत लोकांना भेटून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणासाठी संघर्ष केला आज हिच शाळा पडलेल्या इमारतीतून प्रगतीपथावर आहे याचा आनंद वाटतो अस्या प्रकारचे मार्गदर्शन डॉ. गोपाल रायपुरे यांनी सदर शाळेच्या स्नेहसंम्मेलनाच्या उदघाटनाप्रसंगी केले.
जि.प उच्च प्राथमिक शाळा चकविरकल शाळेचे




 सांस्कृतिक व क्रिडा महोत्सव दि. १० जानेवारी २०२६ ला शाळेच्या पंटागणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मुक्तेश्वर आभारे गायडोंगरी हे होते तर उदघाटक म्हणुन सामाजिक कार्यकर्ता किशोर वाकुडकर उपरी सहउदघाटक डॉ. गोपाल रायपुरे सामाजिक कार्यकर्ता पुप्पाताई शेरकी थेरगांव ईश्वर गंडाटे विरखल प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली तर दिपप्रज्वलन मसरात मॅडम से .नी मुख्याध्यापक हिराचंद रायपुरे अध्यक्ष त. मु . स चकविरकल मुख्याध्यापक चंद्रशेखर विदुरकर उपसरपंच दिपमाला निकुरे गायडोंगरी ,देवाभाऊ आभारे , वर्षा चिमुरकर ,राजु कोलते सर , माहेश्वरी भोयर आदि लाभले होते.


या प्रसंगी सरपंच मुक्तेश्वर आभारे म्हणाले की चकविरखल च्या शाळेला आमचे सहकार्य नेहमीच लाभत आहे. २० लाखांचा निधी वॉल कॅम्पाऊन साठी प्रस्ताव टाकला आहे. मी सरपंच असो वा नसो माझे सहकार्य नेहमी लाभेल.
कार्यक्रमाचे प्रास्तविक भाषण शाळेचे मुख्याध्यापक युवराज दुर्गे यांनी शाळेबाबतची विश्वत माहीती दिली तर संचालन कामिनी आत्राम यांनी मानले. शाळेच्या मुलामुलींनी आपली स्तृप्त गुणातुन कला कौशल दाखविले कार्यक्रमास चकविरखल येथील नागरिक बहुसंख्येनी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments