विदर्भ दखल न्यूज
धानोरा ब्युरो
धानोरा
पारंपरिक इलाका बैठक
दिनांक,01/01/2026 रोज गुरुवार ला ठीक 11.30 वाजता मां दंतेश्वरी देवस्थान मालंदा रोड धानोरा येथे पारंपरिक इलाका बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व प्रथम आजचा सभेचे सभाध्यक्ष म्हणून श्री. दुरु जंगली मडावी रा.कांदाळी यांना सर्वानुमते ठरविण्यात आले.
तसेच खालील विषयावर सविस्तर चर्चा करून सभाध्यक्षाचा परवानगीने ठराव पारित करण्यात आले.
मागील सभेचा इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.तसेच 24 डिसेंबर 2025 "पेसा महोत्सव"
कार्यक्रमाची हिशेब देण्यात आले.त्या कार्यक्रमध्ये एकूण खर्च= 67045 रुपयांच खर्च आली, पारंपारिक इलाका महाग्रामसभा चे अध्यक्ष/सचिव व सदस्य यांनी इलाकातील 32 ग्रामसभाना या बैठकात कार्यक्रमाची खर्च अहवाल वाचून दाखवले व खर्च अहवाल प्रत प्रत्येक ग्रामसभाना देण्यात आली.
(पारंपारिक इलाका महाग्रामसभा धानोरा} ची पुनर्गठित करण्यात आले. सर्व प्रथम समिती गठीत करतानी अध्यक्षांचा सूचक म्हणून श्री. केशरी तोफा पोलिस पाटील (मार्केगाव) यांनी केली. श्री. क्रिष्णा भागरती बुरकुर्या यांना सर्वसहमतीने अध्यक्ष पदामध्ये नियुक्ती करण्यात आले.उपाध्यक्ष च सूचक श्री. हिरामण पदा यांनी केले व अनुमोदक श्री. बाजीराव जांगी यांनी दिले, श्री शामराव रामसिंग उसेंडी यांना उपाध्यक्ष पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच सचिव यांचे सूचक म्हणून श्री जीवन नरोटे यांनी केले, अनुमोदक श्री. हरिदास पदा यांनी दिले. व श्री सामसाय मन्नुराम मातलामी यांची सचिव पदासाठी नियुक्त करण्यात आले. आणि कोषाध्यक्ष म्हणून श्री. चरणदास तोफा यांना सर्वसलाने नियुक्ती करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हणुन श्री. बाजीराव जांगी यांना सर्वसहमतीने निवड करण्यात आले. "पारंपारिक इलाका महाग्रामसभा धानोरा"या कार्यकारणी समिती चे सल्लागार समिती तयार करण्यात आली.श्री. डॉ. देवाजी तोफा ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)श्री. जितेंद्र उईके (गावपुजारी दराची)श्री. सुरेश उसेंडी (पोलिस पाटील लेखा)श्री. परसराम नरोटे श्री. हिरामण गावडे ( ग्रामसभा अध्यक्ष डब्बा)श्री. विजय जाळे (गावपुजारी इरपुंडी)
श्री. केशरी तोफा (पोलिस पाटील मार्केगाव)
श्री. दयाराम गावडे (C.F.R.M.C अध्यक्ष मुंगनेर)श्री. सदाशिव उसेंडी (ग्रामसभा अध्यक्ष पवनी )श्री परसाराम कोवाची ( गापूजारी ढवळी)श्री विठ्ठल मडावी (अध्यक्ष ग्रामसभा हेट्टी)श्री. अमित नरोटे (अध्यक्ष ग्रामसभा चव्हेला)श्री. प्रदीप बोगा (सचिव ग्रामसभा धानोरा)श्री. हनुमंत नरोटे (चव्हेला)श्री मुराजी नैताम, हेट्टी श्री. चेंडू उसेंडीश्री दौलत मतलामी (प्रातिष्ठिक ना. सल्लेभट्टी)श्री महेंद्र उईके (उपसरपंच कान्हरटोल)श्रीमती. नंदा दुगा (सरपंच लेखा)
श्रीमती विमलबाई करंगशहा मडावी ( जिल्हा महा ग्रामसभा. सदस्य) श्रीमती शारदा दर्रो मेंढा, कमलाबाई मातलामी (मालंदा) असे सर्व पदाधिकारी" पारंपारिक इलाका महाग्रामसभा धानोरा "" कार्यकारणी समितीला सल्ला व मार्गदर्शन करतील असे सर्वानुमते ठरविण्यात आले.तसेच धानोरा इलाकातील 32 ग्रामसभांना पारंपारिक इलाका महाग्रामसभा धानोरा यांचा कडे T.P छापण्याकरिता किंवा सक्षम ग्रामसभांना T.P छापण्यास पारंपरिक इलाका महाग्रामसभा धानोरानि मदत करण्याकरिता सहमती ठराव घेतले.जेणेकरून पारंपारिक इलाका महाग्रामसभा धानोरा च्या नियंत्रणाखाली गावाग्रामसभा जसे बांबू, तेंदु,व इतर गौणवनउपजाची विक्री, विल्हेवाट स्वतः ग्रामसभा करेल. जेणेकरून कंत्राटदाराकडून किंवा कोणतेही कंपनी कडून पसवणूक , शोषण होणार नाही. या उदेशाने धानोरा इलाकातील 32 ग्रामसभांनी बैठकीचा सभेमध्ये सविस्तर चर्चा करून पारंपरिक इलाका महाग्रामसभा धानोरा चा आधीन राहून काम करतील.
असे सर्वानुमते चर्चा करून सभाध्यक्षाचा परवानगीने ठराव पारित करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात काही गावामध्ये कंपार्टमेंट नंबर ल पकडून तेंदु,बांबू व इतर गौण वन उपज साठी सीमा हद्दीचा वाद सुरू आहे. तेच प्रकार धानोरा इलाकात गाव सीमा हद्दीसाठी वाद निर्माण होत आहे. म्हणून या सभा बैठकीत धानोरा इलाकातील माजी जमीनदार, इलाका भुमिया, इलाका माझी, गावपुजारी, ग्रामसभा अध्यक्ष सचिव, असे निर्णय घेतले की, सीमा हद्दी संबंधित विभाग जसे, वनविभाग, महसूल विभाग,यांना सतत त्या वाद असलेले गावामध्ये उपस्थित राहण्याकरिता नोटीस द्वारे कळविण्यात येईल.व ज्या गावांचा वाद चालू आहे त्या गावांचा वाद सोडविण्यात येईल. असा या सभा चर्चा मध्ये सविस्तर चर्चा करून सभाध्यक्षाचा परवानगीने ठराव पारित करण्यात आली.तसेच या सभेचे समाप्त जाहीर श्री. क्रिष्ण भागरती भुरकुर्या यांनी सभाध्यक्षाचा परवानगीने सभा समाप्त जाहीर केले.




Post a Comment