सीरोंचा येथील पाणी पिण्याच्या टॉक्या कुचकामी, लिकेज पडण्याच्या स्थितीत...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


सिरोंचा - सिरोंचा येथील सिरोंचा माल वार्ड क्रमांक १४ मधे आसर अली रोड सिरोंचा शहराला पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने पाणी पिण्याच्या एकून चार टॉक्या कालांतराने ग्रामपंचायत कडून बांधण्यात आल्या होत्या आता मात्र सदर टॉक्याच्या ताबा नगर पंचायत कडे आहे ' प्रथमच्या दोन टॉक्या लिकेंग असुन त्यातुन हजारो लिटर पाणी गळून वाया जात असुन सदरच्या नाल्यातुन पावसाळा प्रमाणे पाणी जोराने वाहतांना दिसतात.
महत्वाची बाब म्हणजे दोन टॉक्याअश्याच लिकेंज राहील्या तर त्या कधिही खचल्याशिवाय राहणार असुन यात जिवित हानी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
दुसऱ्या नविन दोन पाणी पिण्याच्या टॉक्या बांधण्यात आल्यात परंतु त्याही कुचकामी असुन बांधलेल्या टॉक्या फेल असल्याचे इंजिनिअरने सांगीतल्यामुळे सदर दोन्ही नविन टॉक्या सुद्धा कुचकामी झालेल्या आहेत. एकंदरीत करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या पाण्याच्या टॉक्याचा नगरपंचायत यांचेकडे देखभाल करणे असतांना नगर पंचायत सिरोंचाचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या ठेकेदारांनी बांधलेल्या नविन दोन कुचकामी निकृष्ठ दर्जाचे टॉक्याची बांधकाम केल्यामुळे सदर ठेकेदाराकडून ति रक्कम वसुल करुन त्यांचेवर फौजदारी कारवाई करावी व सिरोंचा वासीयांना योग्य पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी आरपिआय चे नेते शंकर सेनिगारपु सिरोंचा यांनी केलेली आहे. आमदारांच्या आमसभेत याविषयी नागरिकांनी तक्रार केली असता अजुनपर्यंत चौकशी झालेली नाही.

0/Post a Comment/Comments