विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
पी. के .सातार तालुका
प्रतिनिधी
चामोर्शी
चामोर्शी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या मके पल्ली माल येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक 21 12 2025 रोजी मानवधर्माचे भव्य दिव्य. वार्षिक सेवक संमेलन पार पडले या संमेलनाला अध्यक्ष म्हणून दिवाकरजी ठेंगरी अध्यक्ष परमपूज्य परमात्मक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली उद्घाटक म्हणून भजनरावजी पदा संचालक परमपूज्य परमात्मक एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली प्रमुख अतिथी म्हणून गोविंदरावजी दोनाडकर सर्वेसर्वा परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली
फाल्गुनजी मानकर संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली अध्यक्ष आयोजन नियोजन समिती गुणवंतजी फटे मार्गदर्शक माणिकजी मानकर मार्गदर्शक रवींद्रजी कांबळे मार्गदर्शक श्री वकेकरजी विठ्ठलजी राऊत मार्गदर्शक अमरजी चट्टे मार्गदर्शक गोपालजी बाबनवाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती सेवक संमेलनाच्या निमित्ताने मके
पल्ली माल येथे अंधश्रद्धा स्त्रीभ्रूणहत्या व्यसनमुक्ती हुंडाबळी आदि विषयावर झाकीचे प्रदर्शन दाखवून सामाजिक जनजागृती करण्यात आली मकेपल्ली माल गावातून रॅली काढून मानवतेचा संदेश देण्यात आला. परमपूज्य परमात्म एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोलीच्या वतीने संमेलन स्थळी मानव धर्मावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा
करण्यात आली होते परमपूज्य परमात्मक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली अंतर्गत चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया छत्तीसगड आदी ठिकाणावरून मोठ्या संख्येने सेवक सेविका बालगोपाल सेवक संमेलनाकरिता सहभागी झाले होते संमेलनाच्या निमित्ताने रॅलीच्या माध्यमातून मुलींचे स्त्रियांचे लेझीम नृत्य झाकीच्या माध्यमातून समाज जन जागृतीचे प्रदर्शन शिक्षणाचे महत्व थोर महापुरुषांचे समाजाला लाभलेले महत्त्व आधी वेशभूषा च्या माध्यमातून दाखविण्यात आले. त्यानंतर मानव धर्मावर आधारित चर्चा बैठक घेण्यात आली चर्चा बैठकीमध्ये
मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी दिलेले चार तत्त्व तीन शब्द पाच नियम या आधारावर चर्चा बैठक पार पडली चर्चा बैठकीची सुरुवात सृष्टीचे निर्माता बाबा हनुमानजी मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी मातोश्री आई वाराणसी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून विधिवत पूजाअर्चा करून चर्चा बैठकीला सुरुवात करण्यात आली. चर्चा बैठकीमध्ये समाजामध्ये घडणाऱ्या वाईट चालीरीती अंधश्रद्धा हुंडाबळी स्त्रीभ्रूणहत्या व्यसनमुक्ती समाजामध्ये वाढलेले वाईट अत्याचार आदी विषयावर मार्गदर्शन करून उपस्थित सेवक सेविका बालगोपाल यांना
मानवधर्मात मानवाने मानवासारखे वागले पाहिजे आणि मानवाने समाजात वावरताना माणुसकीने वागले पाहिजे याकरिता मार्गदर्शनातून प्रोत्साहित करण्यात आले. चर्चा बैठकीचा समारोप मानव धर्माच्या सायंकाळच्या प्रार्थनेणे समारोप करण्यात आला चर्चा बैठकीचे प्रस्ताविक प्रमोद गोठेवार मार्गदर्शक मुलचेरा संचालन प्रशांत ठेंगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपजी उपथळे मार्गदर्शक वडसा यांनी
मानले चर्चा बैठकीला हजारोच्या संख्येने सेवक सेविका बालगोपाल यांची उपस्थिती होती मक्केपली माल येथे सेवक संमेलन निमित्याने शांत संयमी वातावरण पाहायला मिळाले सेवक संमेलनाकरिता मक्केपली माल येथील पोलीस पाटील गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी युवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







Post a Comment