आदिवासी विविध कार्यकारी संस्था गोठणगाव येथे नवनियुक्त संचालकांचा झाला सत्कार....


विदर्भ दखल न्यूज 
पवन खोब्रागडे 
तालुका प्रतिनिधी कुरखेडा 








कुरखेडा 
,नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळ वर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील संचालक. आदिवासी विकास महामंडळडात संचालक पदी यापूर्वी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मिळत नव्हती, आदिवासी विकास महामंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अंमलबजावणी करणाऱ्या आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातून संचालक पदी तिघांची बहुमताने निवड






 झाली मतमोजणीत जय सेवा सहकार पॅनल ला यश मिळाले विजयी संचालक पिंपळगाव तालुका वडसा आवीका संस्थेचे सभापती गोपाल उकेइ , तालुका कुरखेडा गोठनगाव आविका संस्थेचे सभापती यशवंत चौरीकर, तालुका एटापल्ली गटा आविका संस्थेचे सभापती सैनू गोटा यांची निवड झाली ,महामंडळाच्या संचालक पदासाठी आदिवासी विविध कार्यकारी संस्था प्रतिनिधी मतदान करतात गडचिरोली व अहेरी या दोन मतदान केंद्रावर 14नोव्हेबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली 16नोव्हेंबर रोजी नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात मतमोजणी करण्यात आली आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकास महामंडळ चे पदसिद्ध अध्यक्ष असतात, सहकार पॅनलच्या विजयासाठी आवीका सचिव कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत जी शेंद्रे पदाधिकारी चांगदेव जी फाये, धर्मदास ऊईके, केशव जी किर सान, रामदास मस्के, लिलाधर जी घोसेकर, बंडूजी बोरसरे, व इतर पदाधिकारी यांनी अधिक परिश्रम घेतले गोठणगाव 
संस्थेचे केंद्रप्रमुख महेश खोबरे व्यवस्थापक माणिक दरवडे यांनी नवनियुक्त संचालकाचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments