विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
गडचिरोली जिल्हा अंतर्गत येत असलेल्या कोरची तालुक्यातील एका गावात एका 30 वर्षीय नरधमाने तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची माणूसकीला काळिमा फासणारी घटना 28 ऑक्टोबर रोजी घडली आहे नरेंद्र हरिदास नंदेश्वर वय तीस वर्षे असे अत्याचार केलेल्या आरोपी नराधमाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित बालिका ही घरी एकटी असल्याचे संधी साधून आरोपी नराधमाने चिमुकल्या बालिकेवर अत्याचार केला चिमुकलीच्या घरातील व्यक्ती घरी आले तेव्हा चिमुकली रडत होती अशी माहिती मिळाली आहे घटनेची तक्रार पोलीस ठाणे कोरची येथे नोंदविली पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी करून आरोपी नराधमाला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली पोलिसांनी घडलेल्या घटनेत आरोपीच्या विरोधात कलम 64/2 ,65 भारतीय न्याय सहीता पोक्सो अंतर्गत कलम 4, 6 ,12 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment