हलक्या धानाची परतीच्या पावसाने केली नासाडी, शेतकऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात...

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 






 गडचिरोली जिल्ह्यात  गेल्या अनेक दिवसापासुन परतीच्या  पावसाने झोडपल्या मुळे हलक्या प्रजातीच्या पिकांच्या फुलोऱ्यावर पाणी गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे.
 सुरवाती पासुनच पावसाने चांगला प्रतीसाद दिल्याने धान पीकही जोमात आले. या वर्षी उत्पाटनात धानाचे निसवे झाले नी धानपिक वाढ होणार या आशेने शेतकरी वर्ग ही आंनदात होता, हलक्या प्रजाती च्या फुलोऱ्यावर असतांना, अचानक सतत पाऊस पडल्याने फुलोरा झडला. यामुळे धान्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे 





 वादळी पावसाने चांगले झोडपल्याने धानपीक बांधीत पडले नी पाणी साचल्याने, धान पीकही सडले, काही बहुत उरलेला धानपीक पानफोल होण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्चही निघनार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. लोकांचे देणेघेणे, घरच्या गरजा अशातच समोर दीवाळी साजरी करायची अशा विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी  मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments