विदर्भ दखल न्यूज
भंडारा
भंडारा जिल्हा अंतर्गत येत असलेल्या लाखांदूर तालुक्यातील चपराळ परिसरात अवैध वाळू मुरूम तस्करीने धुमाकूळ घातला आहे . तस्करीमुळे शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसूल बुळत असल्याचे दिसत आहे. आणि पर्यावरणाचे मोठी हानी सुद्धा होत आहे. लाखांदूर गाव परिसरातील अवैध वाळू मुरूम तस्करी मध्ये काही राजकीय पुढारी आणि गावातील परिसरातील व्यक्ती यांच्या संगनमताने अवैध वाळू मुरूम तस्करी होत असल्याचे सुद्धा जनतेमधून बोलले जावू लागले आहे. मात्र या पुढारीच्या विरोधात गावातील नागरिक बोलताना दिसत नाही. यावरून पुढारी आणि वाळू तस्कर यांची दहशतच म्हणावे लागेल. प्रशासनाचे वाळू मुरूम तस्करासोबत हितसंबंध असल्याचे सुद्धा बोलले जाऊ लागले आहे. नदीपात्रातून होणारी अवैध वाळू तस्करी याला नेमके आशीर्वाद कोणाचे याचे शोध सुद्धा लावून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे . पण तसे होताना दिसत नाही.यावरून असे दिसते की प्रशासनातील लोकांमध्ये कुठेतरी पाणी मुरतंय अशी शंका जनतेमधून व्यक्त होऊ लागली आहे.
महसूल प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तालुक्यातील अवैध्य रेती व मुरूम तस्करीवर आळा घालावा अशी मागणी सुद्धा आता परिसरातील जनतेकडून जोर धरू लागली आहे.

Post a Comment