स्मृतीशेष रा. सू. उपाध्य दादासाहेब गवई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे व भव्य स्मारकाचे लोकार्पण.. राजकीय पटलावर आपली छाप पाडणारे गवई स्मरणात राहतील... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 



गडचिरोली
अमरावती - दिक्षाभूमीच्या स्मारकाचे शिल्पकार , बिहार , सिक्किम व केरळ या तिन राज्यांचे राज्यपाल लोकसभा व राज्यसभेचे सदस्य (खासदार ) महाराष्ट्र विधान परिषदेचे सलग 30 वर्ष राहीलेले आमदार तसेच विधान परिषदेचे सभापती , उपसभापती व विरोधी पक्षनेते आंबेडकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जिवनात एवढा प्रवास करणारे आदरणीय स्मृतीशेष रा सु उपाध्य दादासाहेब गवई हे नेहमीच स्मरणार्थ राहतील अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी गवई यांच्या स्मारकांच्या उदघाटनाप्रसंगी गौरवउद्गार काढले.



दादासाहेब गवई यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या भव्य स्मारकाचे लोकार्पण व पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सरन्यायधिस भुषण गवर्ड लेडी गव्हर्नर कमलाताई गवई पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री पंकज भोयर रिपाईचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई आदि मंचकावर उपस्थित होते.
हा सोहळा मुलांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणे माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा सोहळा असल्याची भावना सरन्यायाधिस भुषण गवई यांनी व्यक्त करून अमरावती विद्यापिठातील १० एकर



 परिसरात ३५ कोटीच्या निधितुन स्मारकाचे काम पुर्ण झाल्याबद्दल सरन्यायाधिस भुषण गवई यांनी सर्वाचे आभार मानले. उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचेही भाषणे झालीत. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments