गावाजवळील तलावात आढळले तीन युवकांचे मृतदेह, नातेवाईक नागरिकांनी व्यक्त केला घातपात असल्याचा संशय ...


विदर्भ दखल न्यूज 
देवरी ब्युरो 



देवरी 
देवरी तालुक्यातील पुराडा गावातील तीन युवकाचे मृतदेह गावालगत असलेल्या गादईबोडीत आढळून आल्याने गाव परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना 5 ऑक्टोबर रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अभिषेक आचले वय 20 वर्ष आदित्य बैस वय 16 वर्ष तुषार राऊत वय 18 वर्ष राहणार पुराडा असे गादाइबोडीत आढळून आलेल्या मृतांची नावे आहेत.
मात्र सदर मृतदेह आढळून आल्याने घातपाताचे संशय निर्माण शंका जनतेकडून व्यक्त होत आहे. रविवार दिवशी पुराडा गावात एका परिवारात साक्षगंधाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाकरिता गावातील काही नागरिक मित्र मंडळी पाहुणे उपस्थित होते. आणि गदेवार टोला पुराडा येथील आदित्य बैस तुषार राऊत आणि अभिषेक आचले हे युवक सुद्धा सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने जेवण त्यांनी सुद्धा केले आणि तिघेजण मिळून मोटरसायकलच्या द्वारे पुराडा येथीलच देशमाता परिसरात काही गावकऱ्यांना फिरताना दिसले अशी माहिती मिळाली आहे. मात्र रात्रीचे आठ ते नऊ वाजून सुद्धा घरी न आल्याने घरच्यांनी इतरत्र शोधाशोध सुरू केली असता गादाई बोडीजवळ त्यांची मोटरसायकल दिसली काही वस्तू सुद्धा त्यांच्या दिसल्या यावरून गावकऱ्यांना संशय निर्माण झाल्याने तिघेजण बोडीतील पाण्यात बुडाले असावेत असा कयास धरून गावकऱ्यांनी मासेमाराना बोलावून त्यांच्या मदतीने शोध मोहीम चालू केली . मासेमाराना
तिघांचे मृतदेह बोडीत मिळाले घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली . लगेच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून तिघांचे मृतदेह शुभविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. सदर मृत्यचे मागे काही घात पात आहे की काय असा संशय गावकऱ्यांनी नातेवाईकांनी व्यक्त केला आहे .
तीनही तरुणाचे मृत एकाकी अचानक झाल्याने नातेवाईक मित्रमंडळी गाव परिसरात मोठी हळद व्यक्त होत आहे.
गावात मोठी शोककळा पसरली आहे.

0/Post a Comment/Comments