सावेला , पोटेगाव रस्त्याची दुरुस्ती करा "अन्यथा, आंदोलन..!

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 

गडचिरोली
गडचिरोली - सावेला पोटेगांव रस्त्याची दैनिय अवस्था निर्माण झालेली आहे. रस्त्यावर महामंडळाच्या गाड्या जाणे तर सोडाच परंतु लोकांना पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे. यापूर्वी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असता पोळ्यापर्यत सदर रोडचे काम सुरु करू असे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत रोडचे काम सुरुच झाले नाही.
सदर रस्याचे काम येत्या आठ दिवसात सुरु केले नाही तर तिव्र आंदोलन करू अशा ईशारा सामाजिक कार्यकर्ते ग्रामसभेचे शिवाजी नरोटे हलामी सरपंच सुरेखा मडावी सावेला सरपंच मनोहर पोटावी दिवाकर हिचामी ज्ञानेश्वर मजुमकर संदिप गोटा दिवाकर फुलझेले आदिनी दिलेला आहे

0/Post a Comment/Comments