विदर्भ दखल न्यूज
नाशिक ब्युरो
नाशिक.
मिळालेल्या माहितीनुसार
मंदिरात पूजेसाठी गेला आणि झाली हत्या नाशिक येथील जय भवानी रोड परिसरातील चव्हाण माळा ठिकाणी पहाटेच्या पाच बाजेच्या दरम्यान अमोल मेश्राम नामक व्यक्तीची हत्या झाली पहाटेच्या सुमारास मंदिरामध्ये पूजेसाठी गेल्यानंतर अमोल मेश्राम यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .मात्र घटना झाल्याच्या काही वेळाने अवघ्या काही तासांमध्ये पोलीस विभागाने तपासाची चक्र फिरवून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे अमोल शर्मा कृणाल सौदे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत. संशयितआरोपींना पॉलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या आम्ही केली अशी कबुली दिल्याची माहिती आहे. संशयित आरोपी कृणाल सौदे आणि मृतक अमोल मेश्राम या दोघांमध्ये प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये वाद सुरू होता आणि त्या वादातूनच ही हत्या केल्याची कबुली दोन संशयित आरोपीकडून देण्यात आली आहे .यावरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक करीत आहेत अमोल मेश्राम नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास रोजच्या घडीला मंदिरामध्ये पूजेसाठी जात असत मात्र जय भवानी रोड येथील त्यांच्या साबरमती सोसायटी येथे पहाटे पाच वाजेच्या दरम्यान मंदिरातून पूजापाठ करून घरी परत येत असताना त्यांच्यावर आरोपीने कोयत्याने वार केले आणि त्यांची हत्या केली अशी माहिती मिळाली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.

Post a Comment