विदर्भ दखल घेत
मंगेश बनसोड प्रतिनिधी
कुरखेडा
गडचिरोली -
दरवर्षीप्रमाणे दिवाळी हा सण यंदाच्या वर्षी एक दीड महिन्या अगोदर आल्यामुळे शेतातील धानपिक कापणे बांधणे चूर्णे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशातच पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीमुळे सरकारने पीक बुडी योजना काढली पण ती योजना शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर न मिळाल्यामुळे शेतकरी हे आपली दिवाळी हा सण चांगल्या परिस्थितीमध्ये पार पाडू शकत नसून शेतकऱ्यांना खंत आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना या वर्षी पिकाचे खूप नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे,
अतिवृष्टी पावसामुळे ,हवामानामुळे, वातावरणामुळे अशा अनेक परिस्थितीला सामना करावा लागला. अशातच दिवाळी हा सण लवकरच आल्यामुळे शेतकरी हे अंधारामध्ये आपली दिवाळी सण साजरा करत आहेत... शासनाचा फुकटाचा शिधा दरवर्षी भेटायचा परंतु यावर्षी तोही बंद केल्यामुळे
जे शेतकरी सर्व जनतेला दोन घास अन्न देतात तेच शेतकरी खुशीने किंवा आनंदाने दिवाळी हा सण साजरा करू शकत नाहीत..
पिक बुडी किंवा अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांचे धान्य पिक नुस्कान झाले त्यांना सरकारने पीक बुडी योजना चे पैसे जर दिवाळी अगोदर जमा केले असते तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली असती. तर शेतकरी उत्साहाने दिवाळी सण साजरा करू शकले असते. तश्यातही आरमोरी वडसा कुरखेडा तालुक्याच्या जंगलातून हत्तीचा कडप शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाहीत उभ्या पिकाचे अथोनाथ नुकसान करीत आहेत हत्तीचे कडप सुद्धा महागात तेरावा महिना करीत आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिन होवून यंदाची दिवाळी अंधारातच करणार आहेत.



Post a Comment