विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गडचिरोली, दि. १९ ऑक्टोबर २०२५
देशाचे लोकप्रिय, दूरदर्शी आणि कर्तृत्ववान नेतृत्व असलेले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर तसेच राज्याचे कार्यकुशल, प्रामाणिक आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी व प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे आष्टी–इलूर जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पक्षात भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
या भव्य भाजप पक्ष प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते होते.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या नेतृत्वात अनेक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात पक्ष प्रवेश केला.
तसेच या सोहळ्यास सावलीचे भाजपा नेते देविदास बानबले, का.आ. जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, प्रकाश अर्जुनवार, संजय बारापात्रे व पवन रामगिरकर आदींचीही उपस्थिती लाभली.
*काँग्रेसला मोठा धक्का — रूपाली पंदीलवार यांचे पती भाजपात!*
चामोर्शी तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार बसले असून, माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रूपाली संजय पंदीलवार यांचे पती संजय पंदीलवार यांनी भाजपाचा दुपट्टा टाकून भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला.
त्यांच्यासह शशांक वैद्य, डॉ. साद्दमवार, गौरव वाट, आयुष पंदीलवार, समीर कारकुटवार, दिलीप प्यारमवार, प्रवीण सुर्तीकार, समीर आचेवार, विश्वनाथ कारकुटवार, मधुकर पुज्जलवार, प्रभाकर तिरपतवार, गणेश बत्तीवार, गंगाधर आलाम, प्रभाकर बावणे, रमेश चुनारकर, आनंद मेश्राम, प्रफुल पंदीलवार, दीपक पंदीलवार, आनंद वर्धेलवार आदींनीही भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षप्रवेश केला.
त्याचबरोबर गडचिरोली शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार राजू भाऊ भुसारी यांनीही भाजपात प्रवेश करून पक्षशक्तीला बळ दिले.
*_नव्या कार्यकर्त्यांचा ऊर्जावान प्रवेश — भाजपा परिवारात नवचैतन्य!_*
नवीन कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश फक्त औपचारिक नव्हता, तर भाजपा परिवारात नवऊर्जेचा संचार करणारा क्षण ठरला.
पक्षप्रवेशानिमित्त नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे भाजपा तर्फे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
स्थानिक जनतेत या पक्षप्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण असून, आष्टी–इलूर व चामोर्शी परिसरात भाजपाच्या कार्याचा नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी या प्रसंगी बोलताना म्हणाले “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो राष्ट्रनिर्मितीचे आंदोलन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात आज भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारा आणि विकासाचा नवा आदर्श घडविणारा हा पक्ष आहे. आज आष्टी–इलूर परिसरातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपा परिवार अधिक सक्षम आणि जनतेच्या मनाशी घट्ट जोडला गेला आहे. या सर्व नव्या कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.”
जनसेवेचे अभियान नव्या उमेदीनं पुढे सरकत आहे!
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राखाली भारतीय जनता पक्षाचे जनसेवेचे अभियान नव्या उमेदीनं, नव्या जोमानं आणि नव्या ऊर्जेनं पुढे सरकत आहे.असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





Post a Comment