विदर्भ दखल न्यूज
बुलढाणा ब्युरो
बुलढाणा
साखरखेडा पासून जवळच असलेल्या शिंदी गावातील एका 65 वर्षे शेतकऱ्यांनी एन दिवाळीच्या दिवशी शेतामध्ये विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजी मानिकराव बुरकुल वय 65 वर्ष असे शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी बुरकुल हे नेहमीप्रमाणे शेतावरती गेले होते मात्र त्या दिवशी शेतावरून बऱ्याच वेळ होऊ नही ते घरी परत न आल्याने मुलांनी शेताकडे धाव घेतली असता ते शेतामध्ये पडून होते आणि त्यांच्याजवळ विषारी कीटकनाशकाची बाटली सुद्धा आढळून आली लगेच त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये नेण्यास सांगितले बुलढाणा येथे उपचार सुरू असताना 22 ऑक्टोबरला रुग्णालयात शिवाजी बुरकुल यांचे निधन झाले. शिवाजी बुरकुल यांच्यावर्ती एका पतसंस्थेचे तीन लाख रुपयाचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी तसा प्राथमिक अहवाल सुद्धा तहसीलदार यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती आहे. घटनेच्या तपास पोलीस विभाग करीत आहे शिवाजी बुरकुल यांच्या एकाकी जाण्याने परिवारावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment