विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
कुरखेडा-सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायधिस भुषण गवई यांच्या कोर्टात खटला सुरु असतांना राकेश किशोर तिवारी वकीलांनी भ्याड हल्ला केला त्या निषेधात कुरखेडा तालुका आरपीआय कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवित कुरखेडा नायब तहसिलदार राजकुमार धनबाते
यांच्या मार्फतीने देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
तहसिल कार्यालय कुरखेडा समोर आयपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना निवेंदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला व दोषीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन देतेवेळी
रिपाई जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे दशरथ साखरे ताराचंद नंदेश्वर आरमोरी तालुका अध्यक्ष सोनुजी साखरे ससैदचे मुक्ताजी दुर्गे जिल्हा सरचिटणीस सुनिल सहारे कुरखेडा तालुका अध्यक्ष प्रमोद सरदारे सचिव मोहनदास मेश्राम युवा अध्यक्ष संतोष खोब्रागडे जेष्ठ नेता चरण कऱ्हाडे जिल्हा उपाध्यक्ष डोमाजी नंदेश्वर मंगेश बन्सोड मोरेश्वर राऊत धम्मदिप लाळे नाजुक भैसारे दादाजी रामटेके बालक भानारकर मंगेश भानारकर मुरलीधर कसारे साहित बहुसंख्य रिपाई कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


Post a Comment