मित्राने मित्राचा केला निर्घुण खुण.. अन् गावपरीसरात मचली मोठी खळबळ...

विदर्भ दखल न्यूज
लाखांदूर ब्युरो



लाखांदूर
लाखांदूर तालुक्यांतर्गत विरली बू.येथे पैसे चोरल्याचा वादातून मित्रानेच मित्राची निर्गुण हत्या केल्याचे खळबळजनक घटना 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सुमारास विरली कालव्याच्या , नहराच्या पाळीवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार 29 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास नरेश दुनेदार आणि नारायण मेश्राम हे दोघे मित्र पवना बुद्रुक ते वीरले बुद्रुक नहराच्या पाळीवर मासवड्या पकडण्यासाठी सोबतच मिळून दोघेजण गेले होते. मात्र त्यादरम्यान पैसे चोरल्याचा कारणावरून नहराच्या पाळीवर दोघा मित्रांमध्ये वाद झाला आणि त्याच वादातून नारायण मेश्राम याने मृतक नरेशला लाथाबुक्याने दगडाने बेद्दम मारहाण केली त्यामध्ये नरेश खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झालाl नारायण मेश्रामणे मृतक नरेश दुनेदार याला कालव्यामध्ये फेकून दिले अशी माहिती मिळाली आहे. . घटनेची माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच धाव घेतल्याने घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमली होती घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली माहितीच्या आधारे लाखांदूर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होऊन गर्दीवर नियंत्रण ठेवून. पोलिसांनी मृतकाचे पंचनामा करून मृतकाचे शव शवविच्छेदनाकरिता लाखांदूर येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मृतक नरेश दुनेदार याचा गावांमध्येच पान टपरीचा व्यवसाय होता . परिवारातील कर्ता एकाकी माणूस गेल्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतकाच्या पश्चात पत्नी दोन मुले पत्नी आणि बराच मोठा हप्त परिवार आहे रुपये चोरल्याचा कारणावरून दोन मित्राचा वाद होऊन मित्राने मित्राचा खून केल्याने गावा परिसरात मोठी खळबळ मचली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments