ट्रॅकने स्कुटीला जब्बर धडक दिल्याने झाला मोठा अपघात अपघातामध्ये दोन युवकाचा झाला मृत्यू...


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 


गडचिरोली: गडचिरोली जिल्हा अंतर्गत येत असलेल्या आरमोरी शहरात सोमवारला आजच
झालेल्या अपघातात ट्रक आणि दुचाकी (स्कुटी) या वाहनांची जोरदार धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर दुखापत झालेल्या दुसऱ्याला दवाखान्यात नेल्या नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुटी दुचाकी तीन युवक जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने स्कुटी दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी होऊन त्या तरुणाला तात्काळ आरमोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या युवकाचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या तरुणाला कुठलीही दुखापत झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.. सदर स्कूटी वाहनावरील तिन्ही तरुण वेगवेगळ्या गावचे रहिवासी आहेत . सदर अपघात आरमोरी येथील भूमी इन्स्पायर कार्यालयासमोर झाला .

अपघात घडल्यानंतर ट्रॅक ड्रायवर घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे . आरमोरी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.स्कुटी आणि ट्रॅक यांच्यामध्ये झालेल्या अपघात हा रस्त्याचे रुंदीकरण नसल्याने झाला असे प्रवास धारक आरमोरीकरातून
बोलले जात आहे .
प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण काम करावे अशी मागणी जनतेमधून होऊ लागली आहे.

0/Post a Comment/Comments