गडचिरोलीतील सुरेश सावकार पोरेड्डीवार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश.. कविता पोरेड्डीवार यांना काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी मिळणार उमेदवारी...


विदर्भ दखल न्यूज 
 गडचिरोली
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 
7822082216







गडचिरोली
गडचिरोली - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तथा माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार  दिनांक २७ ऑक्टोंबर २०२५ ला कांग्रेसच्या पक्षाच्या भव्य मेळाव्यात आपल्या  असंख्य कार्यकर्त्या सोबत आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून कांग्रेसचा दुपट्टा बांधणार आहेत आणि कांग्रेसचा मेळावा सुद्धा सुरेश सावकार पोरड्डीवार यांच्या घरासमोरील भव्य आवारामध्ये होणार आहे.
गडचिरोली नगराध्यक्ष पदाकरीता महिला ओपण राखीव असल्यामुळे आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडून घ्यावयाची असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या भव्य मेळाव्यात सुरेश सावकार पोरड्डीवार यांची पत्नी प्राचार्य कविता सुरेश सावकार पोरड्डीवार यांचाही पक्ष प्रवेश असुन त्या याच कार्यक्रमात कांग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
सुरेश सावकार पोरड्डीवार हे गडचिरोली नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होत . गडचिरोली नगरपरिषद निर्माण झालेल्या वर्षी मागील २०१९ च्या गडचिरोली नगरपरिषद च्या निवडणुकीत कविता पोरड्डीवारअगदी थोड्या फरकाने त्यांना नगराध्यक्ष पदा करिता पराभव पत्करावा लागला होता. आता कांग्रेसच्या पंज्या चिन्हावर उभ्या राहणार असल्यामुळे कांग्रेसमधे नवचैत्यन फुलले आहे. तर भाजपाकडे गिता हिंगे किंवा योगीता पिंपरे यापैकी एकाला भाजपाची तिकीट मिळणार आहे. कविता पोरड्डीवार यांच्या कांग्रेस प्रवेशामुळे व नगराध्यक्ष पदाच्या तिकीटामुळे भाजपाला धक्काच बसणार असला तरी भाजपा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे माजी खासदार अशोक नेते आमदार डॉ. मिलिंद नरोटे व माजी आमदार डॉ. देवराव होळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आदि दिग्गज नेत्यामधे एकत्र येऊन खलबते सुरु असुन भाजपाचा नगराधक्ष पदाचाउमेदवार कोण असला पाहिजे यांची चाचपणी सुरू आहे. 

0/Post a Comment/Comments