विदर्भ दखल न्यूज
कोल्हापूर ब्युरो
कोल्हापूर
कोल्हापूर इचलकरंजी इथे मध्यरात्रीच्या सुमारास बँकेचे व्यवस्थापक यांचा खून झाल्याची घटना घडली आहे बँकेच्या व्यवस्थापकाला दगडाने ठेचून निघून खून करण्यात आला आहे जयपाल कोल्हापूरे वय 40 वर्ष राहणार इंदिरानगर कबनूर असे मृताचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी बँकेमध्ये नोकरीला व्यवस्थापक असलेले कोल्हापुरे वय 40 वर्ष राहणार इंदिरानगर हे सोमवारला बारमध्ये बसले होते. बार मध्ये बसल्यानंतर बार मधील वेटर सोबत बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्यानंतर ते काही वेळानं बरमधून बाहेर पडले असता थोड्याच वेळात अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि दगडाने त्यांना मारण करण्यात आली आणि त्याचा खून करण्यात आला अशी माहिती मिळाली आहे. उच्चशिक्षित कुटुंबातील व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने ठेचून हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे. अज्ञात हल्लेखोर मारेकरांचा पोलीस प्रसन्न प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. बार मधील वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment