शिवनगर विविध समस्यांच्या विळख्यात...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील शिवनगर आणि समता नगर अनेक समस्यांच्या विळख्यात आहे . या विभागात जवळपास १०० ते १५० घरांची वसती आहे . गेल्या २५ वर्षापासून येथे अजूनपर्यंत नाल्या , रोड , विद्यूत पुरवठा करण्यात आला नाही तसेच काही लोकांना घरटॅक्स लावले तर काहींना टॅक्स लावले नाही . या वार्डांत कामगार आणि गरीब आणि मजूर लोक राहतात . राजकारणी लोक त्यांच्या मतांवर निवडून येतात परंतू समस्या सोडवत नाही .
दिवसाढवळ्या वाघांची दहशत, विषारी साप रसत्यावर येतात , घरात घुसतात, विंचू गोम यांसारख्या किटकांची भिती असते .
यापूर्वीसुद्धा अनेकदा प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष आरपिआय , भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष, प्रमोद राऊत, दशरथ साखरे , डोमाजी गेडाम,




 तुळशिराम सहारे माजी नगरसेवक , मंगला मेश्राम, उमेश ढोक , दिवाकर खोब्रागडे , कविता ढोक , पुरुषोतम उमे , अशोक बावणे , युवराज मेश्राम , मिना मेश्राम , अस्मिता मेश्राम, सुनंदा कुकडकर, सुरेखा चापले, विनीता बावणे , दिशा पोहनकर तसेच वार्डातील बहुसंख्य नागरिकांनी निवेदन दिले आंदोलन केले परंतू फक्त आश्वासन देऊन तोंडचे पाणी पुसले .
यावर नगरपरिषद व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करून रोड , नाल्या व विद्यूत पुरवठा करावे अन्यथा त्यांना वार्डात येऊन दिले जाणार नाही असा ईशारा नागरिकांनी दिला .

0/Post a Comment/Comments