विदर्भ दखल न्यूज
बारामती ब्युरो
बारामती
बारामती पासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या ना रोळी येथील एका शेतातील घरात मजुराचा खून करून त्याचा मृतदेह मुरमाच्या ढीगाखाली पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. गणेश शंकर चव्हाण व 49 वर्ष राहणार आर्द्रहळी तालुका शिराटी जिल्हा गदक राज्य कर्नाटक असे मूरमाचे ढिगाऱ्याखाली पुरून ठेवलेल्या मृताचे नाव आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार छाया रमेश महाडिक यांच्या शेतातील फार्म हाऊस वर सध्या फार्मच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे मात्र दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने संरक्षण भिंतीचे काम बंद होते .आणि त्यामुळे चव्हाण आणि नागेश चंद बसपा बुधियाला हे दोघेजण त्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि त्यामुळे नागेशनेच त्याचा धारदार शस्त्राने खून केल्याचा संशय निर्माण झाला. राहत्या ठिकाणावरून चव्हाण बेपत्ता असल्याची तक्रार नागेशनेच खुद्द पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र नागेश फरार झाल्याने महाडिक यांच्या घराच्या समोर असणाऱ्या मुरूमच्या ढिगार्याजवळ भटकी कुत्री भुंकत असल्याचे निदर्शनास आल्याने शोध घेतला असता मुरमाच्या ढिगाराखाली मृतदेह आढळून आला.
घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment