गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
. जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात अवैध कोंबडा बाजार भरवून अती पैश्याच्या लालचेपोटी कोंबड्याच्या झुंजीवर सर्रास लाखोंचा जुगार खेळल्या जात आहे. पोलीस विभागाच्या वतीने
वेळोळी कारवाया केल्या जात असताना रविवारी (दि. २१) चामोर्शी तालुक्यातील रेगडी परिसरातील गरंजी टोला जंगलात जिल्हा पोलिसांनी ऐतिहासिक धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल ९२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात ४६ दुचाकी, ५ चारचाकी वाहनांसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
असल्याची माहिती मिळाली आहे.
तालुक्यातील रेगडी पोलिस ठाणे हद्दीअंतर्गत येत असलेल्या गरंजी टोला जंगलात अवैधरित्या कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळला जात होता. अशी माहिती पोलिस विभागाला
मिळाली. जंगलात विशेष अभियान पथकाचे जवान अभियान राबवित असताना त्यांना कोंबडा बाजारावर शेकडो नागरीक जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती तत्काळ वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशान्वये रेगडी पोलिस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. विशेषअभियानाचे पथक तसेच रेगडी पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकत अवैध कोंबडा बाजार उधळवून लावला. यावेळी घटनास्थळावरून झुंजीचे कोंबडे, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच अन्यसाहित्य, रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत तब्बल ९२ आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींवर रेगडी पोलिस ठाण्यात कलम १२ (ब) महा. जुगार अधिनियम सहकलम ११ (फ) (न)प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रेगडीचे पोलिस उपनिरीक्षक कुणाल इंगळे करीत आहेत.
धाड पडताच जुगाऱ्यांची पळापळ
गरंजी टोला जंगलात भरलेल्या कोंबडबाजारात स्थानिकस्तरावरील नागरिकांसह शेजाराच्या राज्यातीलही काही नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान विशेष अभियान पथकासह रेगडी पोलिसांनी संयुक्तपणे घटनास्थळी धाड टाकली असता पोलिसांची चाहूल लागताच शेकडोंच्या संख्येतील जुगार खेळणा-यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, विशेष अभियान पथकाचे जवान जंगलातच घात लावून असल्याने आरोपीना पळून जाण्यात यश आले नाही. त्यामुळेच तब्बल ९२ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले
सी-६० जवानांच्या मदतीने मोहीम फत्ते
जिल्ह्यातील कोंबडबाजारावरील ही सर्वात मोठी फत्ते करण्यात विशेष अभियान पथकाची (सी-६०) मोठी मदत मिळाली. गडचिरोली उपविभागांतर्गत येत असलेल्या रेगडी पोलिस ठाणे हद्दीतील गरंजी टोला जंगल परिसरात धानोरा सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात ३ अभियान पथकातील जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असताना त्यांना जंगलात मोठमोठ्याने इसमांच्या आरडाओरड करण्याचा आवाज आला. अधिकाऱ्यांसह जवानांनी जवळ जाऊन चौकशी केली असता कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळल्या जात असल्याचे निदर्शनास आले.

Post a Comment