विदर्भ दखल न्यूज
पुणे
.. पुणे जिल्ह्यातील एका चार वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार चार वर्षाची चिमुकली खेळत बाळगत असताना आरोपी वय 65 वर्ष असलेल्या नराधमाने चिमुकलीला जनावराच्या गोठ्यात नेऊन अत्याचार केला आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चिमुकलीचा निर्घृण खून सुद्धा केला या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृती घटनेने पुणे जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरला आहे. माणसाच्या मनाला सुन्न करणारी घटना घडल्याने पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयपणे निर्घृण खून झाल्याच्या घटनेने . राज्यातील चिमुकल्यापासून ते युवती स्त्रियांच्या सुरक्षा बाबतीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोटचा गोळा समजून आणि जिवापाड जपून आई वडिल चिमुकलीचा सांभाळ करीत होते. चिमुकलीचे वय म्हणजे बाहुला बाहुली खेळण्याच वय खेळणे बाळगण्याच वय. त्या चिमुकलीची काय? गलती होती.. गलती ही होती काय की तिने "स्त्री" जाती मध्ये जन्म घेतलाय म्हणून.. स्त्री जातीमध्ये जन्म घेणे गुन्हा आहे काय? की या विकृती बुद्धीच्या नराधम ढेकलाने चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निघृणपणे खून केला या मनाला सुन्न करणाऱ्या प्रश्नाची उत्तरे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाहवा करणारे राज्यातील राज्यकर्ते देणार काय? असे विविध
महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न आता जनतेच्या तोंडून राज्याच्या राज्यकर्त्यांना आता विचारले जाऊ लागले आहेत. चिमुकलीच्या आई वडिलांनी मोठी स्वप्नसुद्धा पाहिली असेल की चिमुकलीला लहानाची मोठे करू तिला चांगले शिकवू तिला घडवू तिला स्वतःच्या पायावर उभे करू मात्र आई-वडिलांचे स्वप्नाचा झालेला घटनेने चुराडा झाला चिमुकलीचे आई वडील पूर्णतः अंतकरणातून मनातून हादरून गेले आहेत
राज्यामध्ये चिमुकलीवर. अत्याचाराच्या घडलेल्या घटने वरून एक प्रश्न निर्माण होतो आहे की खरंच.. या राज्यांमध्ये चिमुकल्या पासून तर मोठ्या स्त्रिया युवती सुरक्षित आहेत काय? असे विविध प्रश्न महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत माणसाच्या मनात घर करत आहेत.
विकृती बुद्धीच्या नराधमाला राज्यातील गृह विभागाने कायद्याच्या चौकटीमध्ये आणून फास्टट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया चालवून लवकरात लवकर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी "की, जेणेकरून राज्यात अशी घटना पुढील काळात होणार नाही. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनात मोठा द्वेष पसरला असून मोठी खदखद निर्माण झाली आहे संतापाची लाट उसळली आहे. शासनाने गुन्ह्याचे स्वरूप पाहता कळक कायदे अमलात आणून सामान्य जनतेला न्याय द्यावा असे आता जनतेतून बोलले जाऊ लागले आहे.


Post a Comment