विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
पत्रकाराला मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारू प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ गडचिरोली जिल्हा प्रमुख दिनेश बनकर
खासदार संजय दिना पाटील याने एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांला मारण्याची भाषा वापरून त्याला धमकी दिली खर तर खासदार संजय दिना पाटील हा एक जनतेचा सेवक असून जनतेने त्याला लोकशाहीच्या चौकटीत राहून जनतेचे विकास कामे करण्याकरिता निवडून दिलेले आहे. मात्र संजय दिना पाटील हा खासदार लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला मारण्याची धमकी दिली आहे यावरून हे सिद्ध होते की हा खासदार जनतेचा सेवक नसून हा जनतेचा भक्षक आहे की काय? हे आता त्याच्या बोलण्यावरून कळेनासे झाले आहे. एक प्रश्न असा निर्माण होतो की हा खासदार कोणाच्या भरोशावर एवढी मोठी भाषा वापरतोय आणि धमकीच्या बाता मारतोय हे सुद्धा जनतेसमोर येणे एवढेच महत्त्वाचे आहे. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनतेचे सर्वसामान्य प्रश्न समाजामध्ये वाढलेले भ्रष्टाचार अन्याय अत्याचार बलात्कार यासारख्या प्रश्नांना लेखणीच्या माध्यमातून वाचून जनतेसमोर न्यायिक वास्तव्य मांडत असतो आणि या चौथ्या स्तंभासोबत अशा प्रकारची एका खासदाराने केलेले वागणूक हे खरंच योग्य आहे का? खासदार संजय दिना पाटील याला बोलण्यापूर्वी मी काय बोलतो आहे याचे भान असायला हवे होते मात्र त्याची आवाक्याच्या बाहेर जीभ घसरली आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पत्रकारांमध्ये खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात एकच ठिणगी उमटली आहे रोष पसरला आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की पत्रकारांसोबत अरेरावी दादागिरी पत्रकारांसोबत असभ्य वागणूक खपवून घेतले जाणार नाही त्यांना जेलची हवा दाखविण्यात येईल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता सध्या या घडलेल्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे आहे की खासदार संजय दिना पाटील याने पत्रकाराला मारण्याची धमकी आणि पत्रकाला असभ्य वागणूक दिल्याने त्या खासदारावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून बोललेला शब्द पाळला पाहिजे आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे तरच पत्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांची असलेले कळवळ पत्रकारांना दिसून येईल खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि धमक्यांचा प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दिनेश बनकर व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहे पत्रकारांच्या मागणीची पूर्तता न झाल्यास वेळप्रसंगी राज्यपापी आंदोलन उभारू असे सुद्धा इशारा प्रशासनाला देण्यात येत आहे जय पत्रकार ,जय संविधान, जय लोकशाही

Post a Comment