विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - ओबीसी सह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावे यासाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ( ओबीसी ) मोर्चा च्या वतीने बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती , प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले . यासोबतच एससी , एसटी , ओबीसी यांच्या समर्थनातील युजीसी बिल लागु करावे , २०११ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक यांना टीईटी पासून मुक्त करावे यासाठी निवेदन देण्यात आले .
हे चरणबद्ध आंदोलन असून पहिल्या चरणात ६ मार्च ला निवेदन देणे , दुसऱ्या चरणात १३ मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन , तिसऱ्या चरणात २३ मार्च ला रॅली प्रदर्शन व चौथ्या चरणात २३ एप्रीलला भारत बंद करण्यात येणार आहे .
२०२७ पासून जनगणना करण्याचा शासनाने ठरविले आहे . परंतू त्यात ओबीसींचा कोणताही उल्लेख नाही . ओबीसींची जातनिहाय जनगणना न झाल्यास ओबीसींची संख्या किती हे न कळल्याने विकास योजना राबवता येणार नाही. . त्यामुळे सरकारच्या विरोधात ओबीसींचा प्रचंड विरोध निर्माण झाल्याने २३ एप्रीलला भारत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .
निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत , बहुजन मुक्ती पार्टीचे नरेंद्र शेंडे , तुळशिराम सहारे, खेमचंद इंदूरकर , आरपिआय चे दशरथ साखरे , लवकुश भैसारे , राष्ट्रीय पिछड वर्ग ( ओबीसी ) मोर्चाचे विवेक धकाते , निशा बोदेले , प्रेमलता कान्हेकर , माया मेश्राम , ममिता भैसारे , डोमाजी गेडाम , प्रेमदास रामटेके , तुषार रामटेके , जयंत गेडाम , संजय गंदाटे , हेमंत बारसागडे उपस्थित होते .


Post a Comment